deepika 
मनोरंजन

राहुल द्रविडनंतर आता दीपिका म्हणते, ‘मी आहे इंदिरानगरची गुंडी’

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते. तिच्या अप कमिंग प्रोजेक्टबाबत तसेच तिच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो ती सोशल मिडीयावर नेहमी पोस्ट करत असते. नुकताच दिपीकाने एक खास फोटो सोशल मिडीयवर शेअर केला आहे. या फोटोला नेटकऱ्याची पसंती मिळत आहे. दीपिकाने तिच्या बालपणीचा एक गोंडस फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. फोटोला दीपिकाने कॅप्शन दिले की, ‘मी इंदिरानगरची गुंडी आहे.’ नुकताच क्रिकेटर राहुल द्रविडने एका जाहिरातीमध्ये 'मी इंदिरानगरचा गुंडा आहे' हा डायलोग मारला होता. त्यानंतर आता हा डायलोग सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये राहूल द्रविड चिडलेले दिसत आहेत. पण दीपिकाने तिच्या लहानपणीचा क्यूट फोटो शेअर करून या डायलॉगला वेगळ्या प्रकारे सोशल मिडीयावर सादर केले.  

राहुल द्रविड यांची ही जाहिरात प्रेक्षकांसोबतच अनेक सेलिब्रेटींच्याही पसंतीस पडली आहे. या जाहिरातीला पाहिल्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीने देखील कमेंट केली. दीपिका लवकरच ‘83’ या भारतीय क्रिकेटमधील सर्वात ऐतिहासिक क्षणावरील म्हणजेच पहिल्या वल्ड कपवर आधारित चित्रपटात पती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. लवकरच दीपिका पहिल्यांदा अभिनेता ऋतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटामध्ये ती ऋतिकसोबत रोमॅन्स करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दिपीकाने स्वत:ची वेबसाईट लाँच केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT